क्रीडा

Ind vs Eng 2nd Test : भारतीय गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा! 4 फिरकी गोलंदाज, जडेजाऐवजी कुणाला पहिली पसंती?

पहिल्या डावात तब्बल १९० धावांची आघाडी घेऊनही पराभवाची नामुष्की ओढवून घेतल्यामुळे भारतीय संघाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे...

Kiran Mahanavar

India vs England Test Series News 2024

विशाखापट्टणम : पहिल्या डावात तब्बल १९० धावांची आघाडी घेऊनही पराभवाची नामुष्की ओढवून घेतल्यामुळे भारतीय संघाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या बॅझबॉल या खेळाला रोखण्यासाठी चौकटीबाहेरची विचारशक्ती बाळगावी लागणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात फिरकी गोलंदाजीच्या जोरावर गेल्या अनेक वर्षांत अमर्याद सत्ता गाजवणाऱ्या भारतीय संघासमोर इंग्लंडने बॅझबॉलची मानसिकता आणि त्यातून निर्माण झालेले स्वीप तसेच रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांनी मोठे आव्हान उभे केले. त्यातच आता विरा कोहलीनंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजाशिवाय खेळावे लागणार आहे. तसेच शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचे अपयश भारतीय संघासमोरच्या अडचणी वाढवणाऱ्या आहेत.

तीन वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती भारतीय संघासमोर ओढवली होती. याच इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पहिला कसोटी सामना गमावला होता, परंतु त्यानंतर जोरदार पुनरागमन करत मालिका जिंकली होती, पण त्या वेळी ज्यो रूटच्या नेतृत्वाखाली संघ आणि त्यांची मानसिकता वेगळी होती.

ऑली पोपने हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात १९६ धावांची खेळी करताना स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे फटके मारून भारतीय फिरती निष्प्रभ करता येते हे दाखवून दिले. आपल्या इतर सहकाऱ्यांनाही त्याने दिशा दाखवली. आता हेच तंत्र पुढच्या सामन्यांतही इंग्लंडचे फलंदाज अवलंबणार हे निश्चित आहे. त्यामुळे भारतीयांना त्यावर उत्तर शोधावे लागणार आहे.

चार फिरकी गोलंदाज?

अंतिम ११ खेळाडूंची रचना करणे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आव्हानात्मक असणार आहे. पहिल्या कसोटीत दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाज अशी रचना होती, पण मोहम्मद सिराजच्या वाट्याला फारशी गोलंदाजी आली नव्हती, त्यामुळे जडेजाची फलंदाजी आणि गोलंदाज म्हणून उणीव भरून काढण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करून बुमराच्या रूपाने एकमेव वेगवान गोलंदाज आणि अश्विन-अक्षर-कुलदीप-वॉशिंग्टन असे चार फिरकी गोलंदाज असाही प्रयोग केला जाऊ शकतो. इंग्लंडचा संघ याच रचनेने दुसऱ्या कसोटीसही सामोरा जाणार आहे. या वेळी त्यांनी मार्क वूडऐवजी जिमी अँडरसन असा बदल केला आहे.

अय्यरसाठी अखेरची संधी

अय्यरसाठी ही अखेरची संधी असू शकेल. विराट कोहली पुढच्या कसोटीत परतला आणि अय्यरला या कसोटीतही धावा करता आल्या नाहीत, तर त्याला तिसऱ्या कसोटीतून डच्चू मिळणे अपरिहार्य ठरू शकेल.

जडेजाऐवजी कुलदीपला पसंती

रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीमुळे दुसरा फिरकी गोलंदाज खेळवावा लागणारच आहे. त्यासाठी कुलदीप यादवला पसंती असे;. मात्र कुलदीपसाठीसुद्धा स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे फटके रोखणे सोपे नसेल. जडेजाच्या अनुपस्थितीचा फटका फलंदाजीतही बसू शकतो. त्यामुळे अक्षर पटेलवरची जबाबदारी वाढत आहे. त्याला जडेजाच्या भूमिकेतून अष्टपैलू कामगिरी उंचावावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT