Cheteshwar Pujara 
क्रीडा

IND vs ENG: पुजाराच्या जागी भारताने 'या' खेळाडूला संधी द्यावी!

IND vs ENG: पुजाराच्या जागी भारताने 'या' खेळाडूला संधी द्यावी! पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने 'टीम इंडिया'ला दिला सल्ला Ind vs Eng 2nd Test Team India should Replace Cheteshwar Pujara with Suryakumar Yadav suggests Pak Ex Cricketer Salman Butt vjb 91

विराज भागवत

Ind vs Eng 2nd Test: इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट याने भारतीय गोलंदाजांची दमदार धुलाई करत १८० धावा कुटल्या. रूटने नाबाद राहत दीडशतकी केली आणि आपल्या संघाला ३९१ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या होत्या. लोकेश राहुलचे दमदार शतक (१२९) आणि रोहित शर्माच्या ८३ धावा यांच्या जोरावर भारताने ही मजल मारली. भारताची मधली फळी पहिल्या डावात अपयशी ठरली. भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरला. त्याने केवळ ९ धावा केल्या. तरीदेखील पुजाराला संधी देणं थांबवू नये. आताच त्याला संघाबाहेर काढणं योग्य ठरणार नाही. आणि जर त्याला संघाबाहेर करायचं ठरलंच तर त्याजागी कोणत्या खेळाडूला संधी द्यावी, याबद्दलचे सल्ले पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट याने दिले.

"पुजारा गेले काही दिवस फलंदाजी करायला बाचकत आहे. त्याला चांगल्या पद्धतीने खेळणं शक्य होत नाहीये. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या फलंदाजीसाठी कठीण आहेत. अशा परिस्थितीत आता पुजाराला संघाबाहेर करायचं असेल तर भारताला वाटत असल्यास त्यांनी थेट सूर्यकुमारला संधी द्यावी. मी केवळ सल्ला देतोय. मुख्य निर्णय हा विराट कोहलीलाच घ्यायचा आहे. कोचनेही यात त्याला मदत केली पाहिजे. आतापर्यंत पुजाराने तीन डाव खेळले आहेत. सध्याचे पिच हे कठीण प्रसंगात फलंदाजाला प्रश्न विचारणारे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नव्या दमाच्या खेळाडूला संधी द्यायची की नाही हे त्यांनीच ठरवलं पाहिजे", असं सलमान बट त्याच्या यु-ट्यूब चॅनेलवरून म्हणाला.

सलमान बट

"इंग्लंडमधील पिच गोलंदाजांना मदत करणारे आहे. अशा वेळी पहिला बळी गमावल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणे आणि अँडरसनसारख्या गोलंदाजांचा सामना करणे हे नव्या दमाच्या खेळाडूला कितपत जमेल हा प्रश्नच आहे. इंग्लंडकडे अतिशय चांगला गोलंदाजांचा ताफा आहे. तशातच त्यांच्या घरच्या मैदानावर ते अत्युच्च प्रतीचा खेळ करू शकतात. पुजारा आणि रहाणे हे दोघे अप्रतिम फलंदाज आहेत. ते सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीयेत. जर भारताने मालिकेच्या मध्यातच एका खेळाडूला बदली म्हणून दुसरा खेळाडू संघात घेतला तर जो खेळाडू बाहेर गेलाय त्याच्यावरचे दडपण वाढेल. तसेच, नव्या खेळाडूवरही खेळाचा दबाव असेल. त्यामुळे सध्याच्या संघात बदल करू नये असं मला वाटतं", असं रोखठोक मत सलमान बटने व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT