Anderson-VIrat 
क्रीडा

IND vs ENG: अँडरसनचा पलटवार! भारताच्या दिग्गजांची केली शिकार

विराज भागवत

IND vs ENG 3rd Test at Leeds: पहिल्या सत्रावर इंग्लंडचं वर्चस्व

Ind vs Eng 3rd Test Day 1 Live: भारतीय फलंदाजांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरलेल्या जेम्स अँडरसनने (James Anderson) तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात घातक पलटवार केला. दुसऱ्या कसोटीत अँडरसन-बुमराह (Anderson Bumrah Fight) वादात बुमराह वरचढ ठरला होता. त्यानंतर या सामन्यात उपाहाराच्या विश्रांतीपर्यंत अँडरसनने भारताचा लोकेश राहुल (KL Rahul), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या तीन दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दोन मुंबईकर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी लंच ब्रेक होईपर्यंत संघाचा डाव सावरला. पण रहाणेदेखील १८ धावांवर बाद झाल्यानंतर ४ बाद ५६ या धावसंख्येवर पहिल्या सत्राचा खेळ थांबला.

गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर टॉस जिंकून विराटने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी करणारा लोकेश राहुल या सामन्यात पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. पाठोपाठ अनुभवी चेतेश्वर पुजारानेही निराशा केली. त्यालाही एका धावेवर माघारी परतावे लागले. त्यानंतर रोहितला साथ द्यायला आलेल्या विराटकडून खूप अपेक्षा होती, पण तो १७ चेंडूत ७ धावा काढत बाद झाला. मुंबईकर अजिंक्य रहाणेला चांगली सुरूवात मिळाली होती, पण 'बर्थ डे बॉय' ओली रॉबिन्सनने त्याला १८ धावांवर माघारी पाठवले. रहाणे बाद झाल्यावर पहिल्या सत्राचा खेळ थांबवण्यात आला. रोहितने मात्र ७५ चेंडूत नाबाद १५ धावा काढत सत्र संपेपर्यंत झुंज दिली.

अश्विनला संधी का नाही?

"इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी रविचंद्रन अश्विनला संघात संधी द्यावी असा विचार आमच्या साऱ्यांचाच मनात आला होता. पण असे असले तरी टॉस जिंकणं आणि हारणं हे आपल्या हातात नसतं. तसेच, चौथ्या वेगवान गोलंदाजाची गरज संघाला लागते हे आम्ही गेल्या दोन सामन्यात पाहिलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही जोखीम उचलून चालणार नव्हती. संघात रविंद्र जाडेजा आहे. लीड्सच्या मैदानावर जर फिरकीला मदत मिळत असेल तर जाडेजा नक्कीच गेल्या दोन सामन्यांपेक्षा जास्त षटके टाकू शकतो आणि आम्हाला अपेक्षित निकाल मिळवून देऊ शकतो. अशा परिस्थितीत जोखीमीचा असलेला अश्विनला संघात घेण्याचा निर्णय आम्ही टाळला आणि जो संघ खेळतो आहेत त्याच संघाला मैदानात उतरवले", अशा शब्दात विराटने अश्विनला संघात न घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT