Joe-Root-Batting 
क्रीडा

IND vs ENG: रूटने पुन्हा रडवलं; इंग्लंडपुढे भारतीय गोलंदाज बेजार

विराज भागवत

Ind vs Eng 3rd Test Day 2: दुसऱ्या सत्रावर वर्चस्व; रूटचं दमदार शतक

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Updates: भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना रडवलं. तीन कसोटी सामन्यात चौथ्यांदा शतक झळकावत त्याने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रावरही इंग्लंडचे वर्चस्व कायम राखले. इंग्लंडच्या फलंदाजांनी बुमराह, शमी, सिराज आणि इशांत चारही गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. रूट आणि या सामन्यात संधी मिळालेला डेव्हिड मलान या दोघांनी चहापानाची विश्रांती होईपर्यंत दमदार फटकेबाजी केली. दोघांनीही अर्धशतके ठोकली पण त्याने मलान ७० धावांवर बाद झाला आणि चहापानाची विश्रांती घेण्यात आली. पण इंग्लंडने तोपर्यंत ३ बाद २९८ धावा करत २२० धावांची आघाडी घेतली होती.

भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी शतकी सलामी देत डावाला आकार दिला. रॉरी बर्न्स (६१) आणि हमीद हसीब (६८) हे दोघे बाद झाल्यावर कर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलानने डाव सांभाळला. या दोघांनी १३९ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडं मोडलं. दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने डेव्हिड मलानला माघारी धाडलं.

त्याआधी, लीड्ससारख्या गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा विराटचा निर्णय फसला. लोकेश राहुल पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारानेही निराशा केली. कर्णधार विराटकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो १७ चेंडूत ७ धावा काढत बाद झाला. मुंबईकर अजिंक्य रहाणेला चांगली सुरूवात मिळाली होती, पण त्यालाही १८ धावांवर बाद करण्यात आले. दुसऱ्या सत्रात तर भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली. केवळ २२ धावांमध्ये भारताने सहा बळी गमावले. ऋषभ पंत (२), रोहित शर्मा (१९), मोहम्मद शमी (०), जसप्रीत बुमराह (०), रविंद्र जाडेजा (४) पटापट बाद झाले. इंग्लंडकडून अँडरसन आणि ओव्हटनने ३-३ तर सॅम करन, ओली रॉबिन्सनने २-२ गडी बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT