IND vs ENG 
क्रीडा

IND vs ENG: अश्विन अजूनही संघाबाहेरच! पाहा भारताचे Playing XI

विराज भागवत

Ind vs Eng 3rd Test at Leeds: विराटने टॉस जिंकला; भारताची प्रथम फलंदाजी

Ind vs Eng 3rd Test at Leeds: पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Ind vs Eng Test Series) तिसऱ्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक (Toss) जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा (Batting First) निर्णय घेतला. २००२ नंतर तब्बल १९ वर्षांनंतर भारतीय संघ या मैदानावर कसोटी सामन्यासाठी उतरला आहे. गेल्या काही वर्षात हे मैदान गोलंदाजीसाठी पोषक (Bowling Friendly) असल्याने या मैदानावर प्रथम फलंदाजी करणे हा धाडसी निर्णय असल्याचे जाणकारांचे मत आहे. बहुचर्चित खेळाडू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याला अद्यापही संघात स्थान देण्यात आलेले नाही. रविंद्र जाडेजाकडून (Ravindra Jadeja) या सामन्यात गेल्या दोन सामन्यांपेक्षा जास्त षटके टाकली जातील असे विराटने सांगितले असल्याने जाडेजाच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. भारतीय संघाने गेल्या सामन्यानंतर संघात कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंडने (England) मात्र संघात दोन बदल केले आहेत.

असा आहे भारताचा संघ

भारतीय संघ गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही मैदानावर उतरला आहे. अश्विन किंवा सूर्यकुमार यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. इंग्लंडकडून मात्र दुखापतग्रस्त मार्क वूडच्या जागी ओव्हरटर्नला संधी देण्यात आली आहे. तसेच, सलामीवीर डॉम सिबलीला संघाबाहेर करण्यात आले असून त्याच्या जागी डेव्हिड मलानला संघात स्थान देण्यात आले आहे.

असा आहे इंग्लंडचा संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT