Haseeb-Hameed 
क्रीडा

IND vs ENG: भारताच्या गोलंदाजांचा कस; सामना रंगतदार स्थितीत

विराज भागवत

Ind vs Eng: भारताला विजयासाठी ८ गडी तर इंग्लंडला २३७ धावांची गरज

Ind vs Eng 4th Test Live Updates Lunch Break: इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांचा कस लागला. पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय संघाला केवळ दोन बळी टिपता आले तर इंग्लंडने ५४ धावांची भर घातली. आता उर्वरित वेळेत भारताला अंदाजे ६३ षटकांच्या खेळात विजयासाठी ८ गडी तर इंग्लंडला २३७ धावांची गरज आहे. कर्णधार जो रूट आणि हसीब हमीद मैदानावर खेळत आहे.

त्याआधी, सलामीवीर रोहित शर्माचे धडाकेबाज शतक आणि चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर व ऋषभ पंतची अर्धशतके यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. विराट कोहलीनेही ४४ धावांची खेळी केली, तर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या दोघांनी शेवटच्या घडीला फटकेबाजी करत बहुमूल्य धावा जोडल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ३, रॉबिन्सन आणि मोईन अलीने २-२ तर अँडरसन, ओव्हरटन आणि जो रूटने प्रत्येकी १ बळी टिपला.

भारताचा पहिला डाव १९१ वर तर इंग्लंडचा पहिला डाव २९० वर आटोपला. इंग्लंडने घेतलेल्या ९९ धावांच्या आघाडीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. लोकेश राहुलने ४६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीने १५०+ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. रोहितने दमदार शतक (१२७) तर पुजाराने झुंजार अर्धशतक (६१) ठोकले. त्यानंतर रविंद्र जाडेजा (९) आणि अजिंक्य रहाणे (०) दोघे ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाले. नंतर विराट ९६ चेंडूत ४४ धावा काढून बाद झाला. मग शार्दूल-पंत जोडीने ही आघाडी पुढे वाढवली. ऋषभ पंत (५०) आणि शार्दूल ठाकूर (६०) या दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. अखेर जसप्रीत बुमराह (२४) आणि उमेश यादव (२५) या दोघांनी भारताला ४६६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Latest Marathi News Live Update : फलटणमधील डॉक्टर आत्महात्या प्रकरणी संशयित आरोपींना २ दिवसाची पोलिस कोठडी

'बाबा आम्हाला वाचवा' खिडकीतून मुलं ओरडत होती, बाहेरून पालकांचा जीव कासावीस होत होता, पवई स्टुडिओ प्रकरणातील धक्कादायक Video

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Baba Vanga Horoscope Prediction : भयंकर ! पूर्वेत युद्ध ते सोन्याच्या किंमतीत महत्वाचे बदल ; बाबा वेंगाची 2026 साठीचं भाकीत उघड

SCROLL FOR NEXT