R Ashwin Ind vs Eng Marathi News 
क्रीडा

R Ashwin Ind vs Eng : इंग्रजांना 2 चेंडूत 2 धक्के...! आर अश्विनचा भारतीय भूमीवर ऐतिहासिक पराक्रम अन् ठरला नंबर-1

टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा भारतातील सर्वात घातक गोलंदाज मानला जातो....

Kiran Mahanavar

R Ashwin IND vs ENG 4th Test : टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा भारतातील सर्वात घातक गोलंदाज मानला जातो. तिने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. या यादीत त्याने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. यावेळी त्याने भारतात अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी कोणताही गोलंदाज करू शकला नव्हता. त्याने अनिल कुंबळेला एका मोठ्या विक्रमात मागे टाकले आहे.

आर अश्विनचा ऐतिहासिक पराक्रम

आर अश्विनने रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 2 बळी घेत भारताच्या 351 कसोटी बळी पूर्ण केले आहेत. यासह तो भारतातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. या खास यादीत त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. यासह तो 350 हून अधिक कसोटी बळी घेणारा भारतातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज

  • आर अश्विन – 351 विकेट्स (वृत्त लिहिपर्यंत)

  • अनिल कुंबळे - 350 विकेट्स

  • हरभजन सिंग – 265 विकेट्स

  • कपिल देव - 219 विकेट्स

  • रवींद्र जडेजा - 210 विकेट्स

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा केल्या. जो रुट 122 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 307 धावा करता आल्या. भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 90 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून शोएब बशीरने 5 बळी घेतले.

अशा स्थितीत इंग्लंडला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी, दुसऱ्या डावात वृत्त लिहिपर्यंत 50 धावांत 2 गडी गमावले आहेत. या दोन्ही विकेट आर अश्विनच्या नावावर होत्या. सलग दोन चेंडूंवर बेन डकेट आणि ऑली पोप यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

Pune Accident : डंपरच्या चाकाखाली दुचाकी गेल्याने तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT