ind vs eng 5th test virat kohli celebration jonny bairstow wicket video went viral kgm00 
क्रीडा

Video Viral: जॉनी बेअरस्टोच्या विकेटवर कोहलीचे खास सेलिब्रेशन

बेअरस्टोला स्लिपमध्ये पकडल्यानंतर विराट कोहलीची सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Kiran Mahanavar

IND vs ENG video viral: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीतील तिसरा दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने या सामन्यात आपले पूर्णपणे वर्चस्व दाखवले आहे. पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात जोरदार वादाने झाली. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला. यादरम्यान बेअरस्टोने 11 वे कसोटी शतकही केले, त्याचा डाव विराट कोहलीच्या एका शानदार झेलने संपला. बेअरस्टोला स्लिपमध्ये पकडल्यानंतर विराट कोहलीची सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

बेअरस्टोला शमीच्या 54 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑफ-साइडमध्ये शॉट खेळायचा होता, पण त्याच्या बॅटची बाहेरची किनार घेत चेंडू पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेला. कोहलीने हा झेल घेतला आणि बेअरस्टोचा १०६ धावांवर डाव संपवला. बेअरस्टोचा झेल घेतल्यानंतर कोहलीने flying kiss दिला. इंग्लंडच्या डावातील 32 व्या षटकात विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात जोरदार वादावाद झाला. विराट कोहली बेअरस्टोला गप्प राहण्याचे संकेत देत असताना बेअरस्टोही गप्प बसला नाही, तो आपली बाजू मांडताना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT