Dinesh Karthik sakal
क्रीडा

Ind vs Eng : भारत दौऱ्यावर येणाऱ्या इंग्लंड संघात सामील झाला दिनेश कार्तिक! मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

India vs England Dinesh Karthik News |

Kiran Mahanavar

India vs England : इंग्लंड क्रिकेट संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. याआधी इंग्लंड लायन्स संघ भारत अ विरुद्ध तीन चार दिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेसाठी इंग्लंड लायन्स संघाच्या प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचाही समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचे पुरुष एलिट वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक नील किलीन हे या दौऱ्यावर इंग्लंड लायन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. त्याचबरोबर भारताचा आंतरराष्ट्रीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे. तो फलंदाजी सल्लागार म्हणून संघात सामील होणार आहे. दौरा सुरू होण्यापूर्वी दिनेश कार्तिक जवळपास नऊ दिवस संघासोबत असेल.

इंग्लंड लायन्स संघाचे प्रशिक्षक

  • नील किलन - मुख्य प्रशिक्षक

  • रिचर्ड डॉसन – सहाय्यक प्रशिक्षक (10- 19 जानेवारी)

  • कार्ल हॉपकिन्सन - सहाय्यक प्रशिक्षक

  • इयान बेल - फलंदाजी सल्लागार (18 जानेवारीपासून)

  • दिनेश कार्तिक - फलंदाजी सल्लागार (10 - 18 जानेवारी)

  • ग्रॅम स्वान - मार्गदर्शक

इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ मालिका वेळापत्रक

  • 12-13 जानेवारी : इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम - ग्राउंड बी

  • 17-20 जानेवारी : इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

  • 24-27 जानेवारी : इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

  • 1-4 फेब्रुवारी : इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT