Rohit-Sharma 
क्रीडा

INDvsENG: एक दोन तीन चार, टीम इंडियाच्या 'हिटमॅन'चा जयजयकार!

विराज भागवत

रोहितने ठोकले ७ चौकार आणि १ षटकार

Ind vs Eng 3rd Test Day 3: भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या डावात झुंजार अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात रोहितने १०५ चेंडूंचा सामना करून केवळ १९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मात्र त्याने आपल्या धावगतीत सुधारणा केली. टीम इंडियाच्या हिटमॅनने संयमी पण वेगवान खेळी करत दमदार अर्धशतक केले. रोहितने १५६ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. त्यात त्याने ७ चौकार आणि १ षटकार खेचला. त्यामुळे हिटमॅनचा नेटकऱ्यांनी अक्षरश: जयजयकार केला. पाहा त्यापैकी निवडक ट्वीट्स-

दरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल स्वस्तात बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दमदार खेळी करत संघाला शंभरी गाठून दिली. चहापानाची विश्रांती होईपर्यंत या दोघांनी संघाला ११२ धावांची मजल मारून दिली. दोघांनीही संयमी पण वेगवान खेळी करत धावा करणं सुरूच ठेवलं. त्यामुळे भारतीय फलंदाजांवरील दडपण कमी झाले.

रोहितच्या बाद होण्यावरून वाद

रोहित शर्मा ५९ धावांवर असताना पायचीत झाला. रोहित नक्की बाद होता की नव्हता याबद्दल चांगलीच चर्चा रंगली. रोहितच्या पायाला चेंडू लागला आणि गोलंदाजाने अपील केले. पंचांनी त्याला बाद ठरवल्यावर रोहितने DRS घेतला. DRSमध्ये जे दिसलं त्यात थर्ड अंपायरने रोहितला अंपायर्स कॉलच्या आधारावर बाद ठरवले. पण नेटकऱ्यांनी मात्र या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात; चार वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT