Ind vs Eng Women's U19 T20 World Cup 
क्रीडा

Ind vs Eng: वर्ल्ड चॅम्पियन! टीम इंडियाने आफ्रिकेत उंचावली अंडर 19 ची ट्रॉफी; इंग्लंडला चारली धूळ

Kiran Mahanavar

Ind vs Eng Women's U19 T20 World Cup : अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकून टीम इंडियाला इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 69 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि टीम इंडियाने ते सात विकेट्स गमावून पूर्ण केले.

भारतीय महिला संघाने प्रथमच विश्वचषक जिंकला आहे. तत्पूर्वी, वरिष्ठ संघ काही अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता, परंतु त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते. आता यंग ब्रिगेड ऑफ इंडियाने हे स्वप्न साकार केले आहे.

भारतीय अंडर-19 महिला संघाने T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. भारताने 36 चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले. सौम्या तिवारी 24 धावा करून नाबाद राहिली. तेथे जी. त्रिशानेही 24 धावांची खेळी खेळली. कर्णधार शेफाली वर्माबद्दल बोलायचे झाले तर तिने 15 धावांचे योगदान दिले.

भारतीय कर्णधार शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण इंग्लिश संघाला केवळ 68 धावांत गुंडाळले. तितास संधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 विकेट घेतल्या. मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी 1-1 विकेट घेतली.

निम्मा संघ 39 वर झाला बाद

तितास संधूने सलामीवीर लिबर्टी हीपला खाते न उघडता माघारी पाठवून भारतला पहिले यश मिळवून दिले. यानंतर अर्चना देवीने प्रथम नियामी हॉलंड आणि त्यानंतर कर्णधार ग्रेस सेव्हन्सला 4 धावांवर बाद करून संघाचे कंबरडे मोडले. इंग्लंडने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Bhau Flex Kadha Campaign : महायुती सरकारला ‘महाराष्ट्र विद्रूपीकरण पुरस्कार’ द्या; काँग्रेसने महायुती सरकारला केले लक्ष्य

Latest Marathi News Live Update: निफाडजवळील पिंपळ येथे मित्रावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; दोघांमध्ये गप्पा सुरू असताना अचानक घडला थरार

Maharashtra Digital Governance 174 Systems : सरकारी कार्यालयांमधील चकरा थांबणार! मुख्यमंत्र्यांकडून १७४ डिजिटल प्रणालींचे लोकार्पण; प्रजासत्ताक दिनापासून राज्यात 'झिरो ब्युरोक्रसी' आणि पेपरलेस प्रशासन!

AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

SCROLL FOR NEXT