India handed five-run penalty England to start its innings with 5/0 r Ashwin running on pitch cricket news in marathi  
क्रीडा

Ind vs Eng : अश्विनच्या चुकीचा टीम इंडियाला फटका, बॅटिंग करण्याआधीच इंग्लंडला मिळाल्या 5 धावा; नेमकं काय घडलं?

India handed five-run penalty England to start its innings with 5/0 : अश्विनची एक छोटीशी चूक संपूर्ण संघाला पडली महागात...!

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. रवींद्र जडेजा आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतासाठी कर्णधारपदाची खेळी खेळली आहे.

या खेळीदरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने मोठी चूक केली आहे. याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागले आहेत. रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत असताना 102 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने ही चूक केली. यासाठी पंचांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमद 102 वे ओव्हर टाकायला आला. यादरम्यान षटकातील चौथ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने शॉट मारला आणि एकेरी धाव घेतली. या वेळी त्याने मोठी चूक केली. अश्विन खेळपट्टीच्या मधून पळत गेला.

कोणत्याही खेळाडूला विकेटच्या मधून पळण्याची परवानगी नाही, यामुळे खेळपट्टी खराब होते. असे असूनही, अश्विनने एकेरी घेण्यासाठी खेळपट्टीच्या मधून पळाला, त्यामुळे पंच जोएल विल्सन यांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला.

आता जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरेल तेव्हा त्यांना 5 मोफत धावा मिळतील. इंग्लंडचा डाव 5-0 ने सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत अश्विनची एक छोटीशी चूक संपूर्ण संघाला महागात पडली आहे.

हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो मालिकेत 2-1 अशी आघाडी घेईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका अद्याप अनिर्णित राहिली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने भारताला धक्का दिला. यानंतर भारताने मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही दमदार पुनरागमन करत विशाखापट्टणम कसोटी जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT