Mohammed Siraj and James Anderson  
क्रीडा

Video: तुफान राडा... अँडरसन-सिराज भर मैदानातच भिडले

भारताच्या डावातील 84 वे षटक पूर्ण केल्यानंतर सिराज आणि अँडरसन यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

सुशांत जाधव

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघमच्या मैदानात पहिला कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाकडे 70 धावांची अल्प आघाडी घेत यजमानांना बॅकफूटवर ढकलले आहे. तिसऱ्या दिवशी पावसामुळे अवघ्या 49 षटकांचाच खेळ झाला. भारतीय संघाचा पहिला डाव 278 धावांत आटोपला असून इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावाला सुरुवातही केलीये. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने बिन बाद 25 धावा केल्या आहेत.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात तुफान राडा झाल्याचे दृष्य पाहायला मिळाले. शुक्रवारी दुसऱ्या सेशनमध्ये हा सर्व प्रकार घडला. मोहम्मद सिराज आणि जसप्रित बुमराह क्रिजवर होते. या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण करुन सोडले.

ही जोडी सेट होत असताना इंग्लंडच्या ताफ्यात निराशेच ढगच जणू दाटून आले होते. कर्णधार ज्यो रूटने तावातावाने अँडरसनकडे थ्रो फेकला. विकेट मिळत नसल्यामुळे हताश झालेला अँडरसनचा संयमही ढळला आणि त्याने मोहम्मद सिराजशी पंगा घेतला. अँडरसनने मॅचमध्ये काही कॅचही सोडले होते. त्यात विकेट नसल्यामुळे त्याने सिराजला स्लेजिंग करणे सुरु केले.

भारताच्या डावातील 84 वे षटक पूर्ण केल्यानंतर सिराज आणि अँडरसन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अँडरसनने सिराजकडे पाहत काही शब्द उच्चारताना दिसले. इंग्लंडच्या गोलंदाजाला सिराजही चांगलाच नडला. अँडरसन फिल्डिंगला आपल्या जागेवर निघून गेला आणि शाब्दिक चकमक संपली. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. सिराज (7) आणि बुमराहने (28) अखेरच्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी रचली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात 95 धावांची आघाडी मिळाली. ओली रॉबिन्सन याने बुमराहला बाद करत पहिल्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT