India vs England Test series 2024 Rajat Patidar News 
क्रीडा

Ind vs Eng : षटकार-चौकारची आतषबाजी! रजत पाटीदारने इंग्लिश गोलंदाजांना फोडला घाम अन् टीम इंडियाचे ठोठावले दार

India vs England Test series 2024 News | भारतीय संघाला या महिन्यात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे....

Kiran Mahanavar

Rajat Patidar News : भारतीय संघाला या महिन्यात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. शुक्रवारी 12 जानेवारी रोजी निवडकर्त्यांनी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

इंग्लिश संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र संघातील काही खेळाडू सध्या भारतात सामने खेळत आहेत. भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात दोन दिवसीय सामना खेळला जात आहे. यामध्ये टीम इंडियाच्या रजत पाटीदारने शानदार शतक झळकावले.

भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन दिवसीय सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश संघाला केवळ 233 धावांवर रोखले. यानंतर रजत पाटीदारने आपल्या अर्धशतकाने दमदार सुरुवात केली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 1 बाद 123 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी रजत पाटीदारने दोन दिवसीय सामन्यात इंग्लिश गोलंदाजांना चांगला घाम फोडला. पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावणाऱ्या या फलंदाजाने दुसऱ्या दिवसाच्या खेळात सावध फलंदाजी करत शतक झळकावले. या फलंदाजाने 131 चेंडूत 18 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. पण 111 धावांवर तो बाद झाला.

रजतने यापूर्वीही अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला टीम इंडियात स्थान मिळालेले नाही.

वृत्त लिहिपर्यंत भारत अ संघाने 3 गडी गमावून 224 धावा केल्या होत्या. सरफराजने शानदार फलंदाजी करत 52 चेंडूत 41 धावा केल्या. तर केएस भरत 12 धावा करून खेळत होता. भरतच्या या खेळीत 3 चौकारांचा समावेश होता. त्याला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. भारत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT