Ravindra Jadeja & KL Rahul India vs England Test Series News Marathi 
क्रीडा

Ind vs Eng : KL राहुल, रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर! मोठे कारण आले समोर

India vs England Test Series News 2024 :

Kiran Mahanavar

India vs England Test Series : जिथे इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सामन्याच्या एका दिवसानंतर संघाला अनेक धक्के बसले आहे. आधी जसप्रीत बुमराहला आयसीसीने फटकारले आणि शिक्षा सुनावली.

त्यानंतर टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुलही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहे. विशेष म्हणजे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहली आधीच संघाबाहेर आहे. म्हणजेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या डोकेदुखी वाढली आहे.

जडेजा आणि राहुलला भारतीय संघातून वगळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळने त्यांच्या बदलीची घोषणा केली आहे. राहुलच्या जागी सरफराज खानला संघात संधी मिळाली. ज्याने भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळाले. याशिवाय आवेश खानही रणजी संघात राहणार असून त्याच्या जागी सौरभ कुमारची निवड करण्यात आली आहे.

KL राहुल, रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर काय आहे कारण ?

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलानी मांडीला दुखत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे तो 2 फेब्रुवारीपासून होणाऱ्या विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर गेला आहे. याशिवाय रविवारी हैदराबाद कसोटीत रवींद्र जडेजा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा बळी ठरला होता. दुसऱ्या डावात धावा घेताना जडेजा जखमी झाला आणि त्यामुळे तो धावबादही झाला. आता हे दोन्ही खेळाडू तिसऱ्या कसोटीपर्यंत परततात की नाही याविषयी आगामी अपडेटची प्रतीक्षा केली जाईल.

टीम इंडियाचा नवा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार, सौरभ कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT