Rehan Ahmed latest marathi news sakal
क्रीडा

Ind vs Eng : साहेबांचा संघ पुन्हा सापडला अडचणीत! 'या' खेळाडूला थांबवले विमानतळावर, जाणून घ्या प्रकरण

England Team in India for Test Series : इंग्लिश संघ सध्या भारतीय दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे....

Kiran Mahanavar

India vs England Test Series : इंग्लिश संघ सध्या भारतीय दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे.

दुसरा सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ सरावासाठी अबुधाबीला परतला. मात्र आता तिसऱ्या सामन्यासाठी राजकोटला पोहोचला आहे. मात्र यादरम्यान इंग्लंड संघाचा स्टार फिरकीपटू रेहान अहमदला राजकोट विमानतळावर थांबवण्यात आले. खरंतर, पाकिस्तानी वंशाच्या रेहान अहमदकडे फक्त सिंगल एंट्री व्हिसा होता. या कारणामुळे त्याला विमानतळावर थांबवण्यात आले.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तातडीने व्हिसाची कारवाई केली. यानंतर रेहान अहमदला व्हिसा देण्यात आला आणि त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली. या मालिकेपूर्वी पाकिस्तानी वंशाच्या शोएब बशीरला व्हिसामुळे अबुधाबीमध्ये राहावे लागले होते. मात्र, काही दिवसांनी त्याला व्हिसा मिळाला आणि त्यानंतर तो भारतात आला. यानंतर तो दुसरी कसोटीही खेळला.

इंग्लंडचा संघ सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता विमानतळावर पोहोचला आणि रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये पोहोचला. तर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स आणि रेहान अहमद रात्री नऊच्या सुमारास हॉटेलमध्ये पोहोचले. इंग्लंड आणि भारतीय संघ आजपासून (13 फेब्रुवारी) राजकोटमध्ये एकत्र सराव करतील.

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडसाठी वाईट बातमी आली आहे. संघाचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो विझाग (विशाखापट्टणम) येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Mumbai Emergency Helpline Numbers: मुंबईत दरड कोसळल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत कोणता नंबर डायल कराल? जाणून घ्या सर्व हेल्पलाईन क्रमांक

Marathi News Live Updates : चंदा चोर, चंदा चोर! लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी, अमित शहांना चर्चेला बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT