India vs England Test Series News 2024 marathi sakal
क्रीडा

Ind vs Eng : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान 'या' खेळाडूची ताफ्यात एन्ट्री! पुढील सामन्यात मिळणार संधी?

India vs England Test Series News 2024 :

Kiran Mahanavar

India vs England Test Series :

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघांनी जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्यात संघाचा नसलेला एक स्टार खेळाडू आपल्या संघात सामील झाला आहे.

इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशीर मालिका सुरू होण्यापूर्वी संघासोबत भारतात आला नव्हता. कारण त्याला भारताचा व्हिसा मिळाला नाही, त्यामुळे तो इंग्लंडला परतला. आणि पहिल्या कसोटी सामन्याचा भाग होऊ शकला नाही. मात्र, नुकताच शोएब बशीरला भारताचा व्हिसा मिळाला असून तो आता इंग्लंड संघात सामील झाला आहे.

20 वर्षीय क्रिकेटर शोएब बशीर काउंटी क्रिकेट क्लब सॉमरसेटकडून खेळतो. त्याने अद्याप इंग्लंडकडून एकही सामना खेळलेला नाही. शोएब बशीरचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी त्याचे आई-वडील पाकिस्तानी आहेत.

शोएब बशीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली असून मालिकेच्या पुढील सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. मालिकेतील दुसरा सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक-

पहिली कसोटी : इंग्लंड 28 धावांनी जिंकला

दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम

तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट

चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची

पाचवी कसोटी: 7-11 मार्च, धर्मशाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT