Prakashika Naik Indian Women's Cricket Team esakal
क्रीडा

IND vs ENG T20 Series : अभिमानास्पद! भारतीय महिला क्रिकेट संघात कोकणची 'प्रकाशिका' चमकणार; अष्टपैलू म्हणून निवड

क्रिकेट मंडळाने जाहीर केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

इंग्लंड देशाचा अ संघ भारत देशाच्या दौऱ्यावर येत आहे. मालिकेतील टी-२० सामन्यांना २९ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत आहे.

ओरोस : भारतीय महिला क्रिकेट संघात (Indian Women's Cricket Team) आंबडोस (ता. मालवण) गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक (Prakashika Naik) हिची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय टी-२० महिला क्रिकेट स्पर्धेत तिने मुंबई संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्यामुळे क्रिकेट मंडळाने जाहीर केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. शाळा स्तरापासून क्रिकेट खेळाची आवड असलेल्या प्रकाशिका हिने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. सुरुवातीला भारताच्या १९ वर्षांखालील महिलांच्या संघात स्थान प्राप्त केल्यानंतर ती मुंबई महिला संघाची उपकर्णधार झाली होती.

त्यानंतर ती कर्णधार म्हणून कार्यरत होती. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय टी-२० स्पर्धेत मुंबई संघाला विजेतेपद मिळाले आहे. यामध्ये प्रकाशिका हिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तिची भारतीय महिला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. ती उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते.

तिने लेगस्पिनर म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ‘स्लिप’मधील स्पेशालिस्ट म्हणूनही तिची ओळख आहे. ती उत्तम फलंदाज आहे. प्रकाशिकाच्या निवडीने आपल्या गावाचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचणार असल्याच्या भावना आंबडोसवासीयांकडून व्यक्त होत आहे.

इंग्लंडसोबत खेळणार

इंग्लंड देशाचा अ संघ भारत देशाच्या दौऱ्यावर येत आहे. मालिकेतील टी-२० सामन्यांना २९ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत आहे. ता. २९ नोव्हेंबर आणि १, ३ डिसेंबर असे एकूण तीन सामने आहेत. यामध्ये प्रकाशिका खेळणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघात खेळण्याचे माझे स्वप्न होते. यासाठी मी प्रचंड मेहनत घेत इथपर्यंत पोहोचली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टी- २० स्पर्धेत प्रथमच विजेतेपद मिळाले. त्यात मला योगदान देता आले. विश्वचषक स्पर्धेत मला भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. भारताला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे.

-प्रकाशिका नाईक, युवा क्रिकेटपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT