क्रीडा

IND vs ENG Test : BCCI ने टीम इंडियाच्या A स्कॉडची केली घोषणा! रजत पाटीदार अन् सरफराज खानची संघात एन्ट्री

Kiran Mahanavar

IND vs ENG Test India A squad : बीसीसीआय भारतीय संघाची आगामी अफगाणिस्तान आणि इंग्लंड मालिकेसाठी संघाची घोषणा करण्याची वाट सर्वजण पाहत आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी बीसीसीआयने भारतीय अ संघाचा संघाची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सराव सामन्यांमध्ये हा संघ इंग्लंड लायन्सचा सामना करेल.

बीसीसीआयने या संघात सरफराज खान आणि रजत पाटीदार यांना स्थान दिले आहे. अभिमन्यू ईश्वरनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे. याशिवाय टीम इंडियाकडून खेळलेला नवदीप सैनीही या संघाचा एक भाग आहे.

मात्र आश्चर्याची बाब म्हणजे रणजीमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या रिंकू सिंगला संघात स्थान मिळालेले नाही. केएस भरत हा या संघाचा एक भाग आहे. तसेच ध्रुव जुरेलची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

या सराव सामन्यातील पहिला सामना 12 आणि 13 जानेवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बी ग्राउंडवर होणार आहे. त्यानंतर 17 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान दुसरा सराव सामना नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य मैदानावर खेळला जाईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

टीम इंडियाचा संघ - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, प्रदोष रंजन पॉल, केएस भरत (यष्टीरक्षक), मानव सुथार, पुलकित नारंग, नवदीप सैनी, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT