Cheteshwar Pujara News sakal
क्रीडा

Ind Vs Eng : आता सगळं संपलं... दुहेरी शतक ठोकल्यानंतरही चेतेश्वर पुजारा संघातून बाहेर

Cheteshwar Pujara News :

Kiran Mahanavar

India vs England Test series 2024 News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. 25 जानेवारीपासून ही कसोटी मालिका सुरू होत आहे. घोषणा करण्यात आलेल्या या भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंची नावे नाहीत.

ज्यामध्ये मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, इशान किशन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंचा समावेश आहे. यातील सर्वात आश्चर्यकारक नाव चेतेश्वर पुजाराचे आहे. पुजारा हा कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची भिंत होता. पण पुजाराला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर ठेवण्यात आले होते. त्यानंतर चेतेश्वर पुजारा देशांतर्गत क्रिकेटकडे वळला आणि रणजीमध्ये शामदार द्विशतक झळकावले. यासोबत संघात पुनरागमन करण्याचा दावा ठोकला.

चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले. त्यानंतर आता पुजारा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकेल अशी आशा चाहत्यांना होती. असे असतानाही निवड समितीने त्याच्याकडे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून दुर्लक्ष केले आहे.

त्यानंतर आता पुजारा कधी टीम इंडियात परतणार किंवा पुजाराची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्द संपणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. पुजाराची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी खूपच चांगली आहे. आणि त्याला इंग्लंडसारख्या मोठ्या संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव पण आहे, तरीही त्याला संघातून वगळण्यात आले.

पुजाराची कसोटी कारकीर्द

चेतेश्वर पुजारा बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळत आहे, पण गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. पुजाराने आतापर्यंत टीम इंडियासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 7195 धावा आहेत. या काळात पुजाराने 19 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत. पुजाराची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या 206 धावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT