Ind vs Eng test Team India Squad marathi news sakal
क्रीडा

Ind vs Eng : टीम इंडियाला लागले ग्रहण... कर्णधार रोहित टेन्शनमध्ये! दुखापतीमुळे इतके खेळाडू संघाबाहेर

Ind vs Eng test Team India Squad : एकापाठोपाठ एक खेळाडूला दुखापती होत असल्यामुळे संघनिवडही लांबली

Kiran Mahanavar

India vs England Test Series 2024 : सुपरस्टार विराट कोहली संघात परतण्याची शक्यता कमी असताना, तसेच केएल राहुलबाबतीतही अनिश्चितता असताना भारताला आणखी एक धक्का बसला आहे. पाठीचे आणि मानेचे स्नायू आखडल्यामुळे श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या पुढच्या तिन्ही सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

विशाखापट्टण येथे झालेला दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर पुढच्या तिन्ही कसोटींसाठी संघ निवड करण्यात आलेली नाही; तसेच तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार असल्यामुळे भारतीय खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. एकापाठोपाठ एक खेळाडूला दुखापती होत असल्यामुळे संघनिवडही लांबली आहे.

विराट कोहली आणि केएल राहुल संघात नसल्यामुळे मधल्या फळीची जबाबदारी श्रेयस अय्यरवर आहे; परंतु त्याला अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. दोन कसोटीत ३५, १३ आणि २७, २९ अशाच धावा करता आलेल्या आहेत. विराट आणि राहुल संघात असते, तर श्रेयसला अंतिम ११ खेळाडूंत खेळण्याची संधी मिळाली नसती.

श्रेयस अनफिट ठरला, तर केएल राहुल तंदुरुस्त होऊन संघात परतणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे असेल; अन्यथा मधली फळी एकदमच नवखी होईल. दुसऱ्या कसोटीत राहुलच्या ठिकाणी रजत पाटीदारला पदार्पणाची संधी मिळाली; परंतु त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. सर्फराझ खान हा संघातील आणखी एक नवोदित फलंदाज आहे.

राहुलपाठोपाठ श्रेयसही खेळू शकला नाही, तर सर्फराझचे पदार्पण निश्चित असेल; मात्र याच संधीचा फायदा घेऊन इंग्लंडचा संघ फायदा घेऊ शकतो. भारताकडे रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल असे तीनच भरवशाचे फलंदाज असतील.

कोण कोण खेळाडू आहेत संघाबाहेर

१) विराट कोहली, २) केएल राहुल, ३) रवींद्र जडेजा, ४) मोहम्मद शमी. आता ५) श्रेयस अय्यरही पुढील सामन्यांस मुकण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT