rohit sharma, virat kohli esakal
क्रीडा

IND vs ENG: विराट कोहली खेळतो फुटबॉल, तर रोहित गाळतोय नेटमध्ये घाम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर चांगलाच घाम गाळत आहे.

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याच्या जवळ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर चांगलाच घाम गाळत आहे. 1 जुलैपासून एजबेस्ट येथे होणार्‍या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर समस्या निर्माण झाल्या आहे. राहुलच्या गैरहजेरीत इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत शुभमन गिल रोहितसोबत ओपनिंग करणार असल्याचे मानले जात आहे.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. लंडनहून लीसेस्टरला गेल्यानंतर टीम इंडियाने सोमवारी पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. एकीकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी फुटबॉल खेळताना दिसले, तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे.

भारतीय संघ १६ जूनला इंग्लंडला पोहोचला होता. मात्र, आता सराव सामना खेळण्यासाठी लीसेस्टर आला आहे. कर्णधार रोहित शर्मा एका दिवसानंतर संघात सामील होता. त्याचवेळी प्रशिक्षक राहुल द्रविड, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सोमवारी इंग्लंडला पोहोचले आहे. द्रविड, पंत आणि अय्यर आज सराव सत्रात भाग घेणार आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT