Virat Kohli Twitter
क्रीडा

IND vs ENG : रहाणेमुळे कोहलीची फिफ्टी झाली, पण...

टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या असून संघावर डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावण्याची चिन्हे दिसत आहेत.

सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी पुजाराच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. ओली रॉबिन्सनच्या इनस्विंग चेंडू सोडण्याच्या नादात त्याने विकेट फेकली. चौथ्या दिवशीच्या खेळात 9 चेंडूचा सामना करणाऱ्या एकाही धावेची भर न घालता 91 धावांवर माघारी फिरला. पुजारा आणि कोहलीने 2 बाद 215 धावांवरुन टीम इंडियाच्या डावाला सुरुवात केली होती.

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील 87 व्या षटकात अँडरसनच्या चेंडूवर विराट कोहलीच्या विरोधात जोरदार अपील झाली. अंपायरने कोहलीला बाद दिले. चेंडूंनं बॅटची कड घेतल्याचे वाटल्यामुळे विराटनेही मैदान सोडण्याची तयारी दर्शवली. पण नॉन स्ट्राइकला असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं कर्णधार विराट कोहलीला थांबवले.

त्यानंतर विराटने त्याच्यासोबत चर्चा करत रिव्ह्युव्ह घेतला. आणि तो यशस्वीही ठरला. मैदानातील पंचांनी त्याला बाद दिले त्यावेळी तो 46 धावांवर खेळत होता. त्यानंतर चौकार खेचून कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर त्याने विकेट फेकली. ओली रॉबिन्सनच्या चेंडू खेळताना त्याच्याकडून मोठी चूक झाली आणि तो झेलबाद झाला.

कर्णधार विराट कोहलीनं मैदानात सोडल्यानंतर उपकर्णधारही त्याच्या पाठोपाठ माघारी फिरला. अँडरसनने अजिंक्य रहाणेला अवघ्या 10 धावांर माघारी धाडले. टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला. युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत टीम इंडियाच्या खात्यात अवघ्या 1 धावेची भर घालून माघारी परतला. चौथ्या दिवशीच्या खेळातील पहिल्या 12 षटकांच्या खेळात 24 धावांत टीम इंडियाने चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या असून संघावर डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT