IND vs ENG Virat Kohli withdraws from remaining three Tests marathi news sakal
क्रीडा

Virat Kohli Breaking : कारकिर्दीत पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर; 'या' खेळाडूला मिळाली संधी

Virat Kohli withdraws from India-England series :

Kiran Mahanavar

Virat Kohli Breaking : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विराटने बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.

वृत्तानुसार, कोहलीने शुक्रवारी बीसीसीआयला त्याच्या उपलब्धतेची माहिती दिली. त्याच दिवशी निवडकर्त्यांनी राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे होणाऱ्या कसोटीसाठी संघ निश्चित करण्यासाठी ऑनलाइन बैठक घेतली. विराट कोहली घरच्या मैदानावरील संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वृत्तानुसार, वरिष्ठ निवड समितीने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी आकाश दीपची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत आवेश खान बाहेर जाऊ शकतो.

वृत्तानुसार, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे पुढील तीन कसोटी सामने खेळू शकणार नाही. तर केएल राहुल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा मालिकेतील दुसऱ्या कसोटीत खेळले नव्हते. दोघांनाही तंदुरुस्त घोषित करण्यात आले असून त्यांचे पुनरागमन निश्चित आहे. हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान, राहुलने उजव्या दुखत असल्याची तक्रार केली होती. दोघांच्या समावेशामुळे भारतीय संघाची बाजू अतिशय संतुलित असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT