ind vs ned boyfriend openly proposed to his girlfriend during live match  sakal
क्रीडा

VIDEO : माझ्याशी लग्न करशील! मॅच सुरु असताना दुसरीकडे रंगला प्रपोझचा खेळ

लाईव्ह मॅचमध्ये अप्रतिम दृश्य, चाहत्याने गुडघ्यावर बसून केले प्रेयसीला प्रपोज; व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

T-20 World Cup India vs Netherlands : टी-20 विश्वचषक मध्ये भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनीच्या मैदानावर सामना खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 57 धावांनी सहज जिंकला. या सामन्यादरम्यान एकीकडे भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत असतानाच दुसरीकडे एक अद्भुत पाहायला मिळाला. लाइव्ह मॅचदरम्यान मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टी-20 विश्वचषकच्या नेदरलँडच्या डावाच्या 7 व्या षटकात ही घटना पाहिली. नेदरलँड संघाने 2 विकेट गमावल्या होत्या. इतक्यात कॅमेरामनने कॅमेरा स्टँडकडे वळवला. यादरम्यान एक क्रिकेट चाहता आपल्या मैत्रिणीला तिच्या गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसला, ज्याला मुलीने हो म्हणत उत्तर दिले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारताने दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरूद्ध 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या. भारताची रन मशिन पुन्हा एकदा भरात आली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र सलामीवीर केएल राहुलला नेदलँडविरूद्ध देखील मोठी खेळी करण्यात अपयश आहे. तो 9 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 62 धावांची तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट आणि सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत नाबाद 95 धावांची भागीदारी रचली. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 123 धावा करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT