क्रीडा

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास! सचिन-सेहवागनंतर 'ही' कामगिरी करणार तिसरा भारतीय सलामीवीर

Kiran Mahanavar

Rohit Sharma Record : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप सामन्यात इतिहास रचला आहे. रोहित शर्मा आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 'हिटमॅन' रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

रविवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 12 धावा करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो केवळ तिसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. रोहित शर्मापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी हा पराक्रम केला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय सलामीवीर

  • 1. वीरेंद्र सेहवाग - 15758

  • 2. सचिन तेंडुलकर - 15335

  • 3. रोहित शर्मा - 14000

  • 4. सुनील गावस्कर - 12258

  • 5. शिखर धवन – 10867

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर

  • 1. सनथ जयसूर्या - 19298

  • 2. ख्रिस गेल - 18867

  • 3. डेव्हिड वॉर्नर - 18026

  • 4. ग्रॅम स्मिथ - 16950

  • 5. डेसमंड हेन्स - 16120

  • 6. वीरेंद्र सेहवाग - 16119

  • 7. सचिन तेंडुलकर - 15335

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT