क्रीडा

IND vs NED : 2 शतक, 3 अर्धशतक...! भारतीय फलंदाजांनी बंगळुरूमध्ये फोडले फटाके अन्...

Kiran Mahanavar

IND vs NED World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 4 गडी गमावून 410 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपच्या 48 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संघाच्या टॉप-5 फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

टीम इंडियासाठी रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली यांनी 50 हून अधिक धावांची खेळी खेळली. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने शतक ठोकले.

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि सर्व 8 जिंकले आहेत. अशा स्थितीत संघाला सलग 9व्या विजयाची नोंद करायची आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 15 नोव्हेंबरला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करायचा आहे.

दिवाळीच्या दिवशी चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांना त्यांच्या टीमने नाराज केले नाही आणि एकामागून एक फटाके फोडून त्यांची दिवाळी आणखी खास बनवली.

श्रेयस अय्यरने 84 चेंडूत शतक ठोकले, तर केएल राहुलने अवघ्या 62 चेंडूत शतक झळकावले. टीम इंडियाच्या या दोन शतकवीरांनी उपांत्य फेरीपूर्वी न्यूझीलंडला मेसेज दिला आहे की, आम्ही पूर्णपणे तयार आहोत.

नेदरलँडसोबत खेळल्या जात असलेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जिथे संघाच्या प्रत्येक फलंदाजाने कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. सर्वप्रथम कर्णधार रोहित शर्माने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. शुभमन गिलही मागे राहिला नाही आणि 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून बाद झाला.

चिन्नास्वामीचा लाडका विराट कोहलीने 56 चेंडूत 51 धावांचे अर्धशतक झळकावले. अशाप्रकारे तिन्ही फलंदाज पन्नास धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण केले आणि शतक झळकावले. केएल 102 (64) धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, तर अय्यर 128 धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे टीम इंडियाने 50 षटकात एकूण 410 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT