ind vs nz 1st odi India beat New Zealand by 12 runs in a thrilling
ind vs nz 1st odi India beat New Zealand by 12 runs in a thrilling  
क्रीडा

IND vs NZ: गिलचे द्विशतक पाण्यात जाता जाता वाचलं! 'लोकल बॉय' सिराजने केली कमाल

Kiran Mahanavar

India beat New Zealand by 12 runs : तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली.

टीम इंडियाने हा सामना 12 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 49.2 षटकांत सर्वबाद 337 धावांवर आटोपला.

मायकेल ब्रेसवेलने किवी संघासाठी झंझावाती शतकी खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. भारताने हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

एका वेळी 131 धावांवर सहा विकेट गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संघर्ष करत होता. टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण येथून मायकल ब्रासवेल आणि मिचेल सँटनरने डाव सांभाळला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 102 चेंडूत 162 धावांची भागीदारी केली. सँटनर 45 चेंडूत 57 धावा करून बाद झाला.

शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावा करायच्या होत्या. शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर ब्रासवेलने षटकार ठोकला.

शार्दुलने पुन्हा वाईड गोलंदाजी केली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने ब्रासवेलला एलबीडब्ल्यू केले आणि टीम इंडियाचा विजय झाला. ब्रासवेलने 78 चेंडूत 140 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 10 षटकार मारले.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी खेळी खेळताना टीम इंडियाला 349 धावांपर्यंत नेले. 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावा केल्या. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी द्विशतक झळकावताना गिलने सर्वात कमी वयात हा पराक्रम करून विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 34 धावा केल्या आणि याशिवाय सूर्यकुमार यादवने 31, हार्दिक पांड्याने 28 आणि वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा केल्या. विराट कोहली आठ आणि इशान किशन पाच धावा करून बाद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT