IND VS NZ sakal
क्रीडा

IND VS NZ : भारत अ संघाचे निर्भेळ यश

सॅमसन, तिलक, शार्दुलची अर्धशतके, राज गोलंदाजीत प्रभावी

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय अ संघाने न्यूझीलंडच्या संघाचा १०६ धावांनी दणदणीत पराभव करून तिसराही सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत व्हॉईटवॉश दिला.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २८४ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला ३८.३ षटकांत १७८ धावांत गुंडाळले. अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आलेल्या राज बावाने अवघ्या ११ धावा देत चार विकेट मिळवल्या; तर राहुल चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेटचे योगदान दिले.

तत्पूर्वी भारतीय संघाकडून सॅमसन, तिलक वर्मा आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके केली. यातील शार्दुल तर भलताच आक्रमक होता. त्याने ३३ चेंडूतच ५१ धावा कुटल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत अ : ४९.३ षटकांत सर्व बाद २८४ (संजू सॅमसन ५४- ६८ चेंडू, १ चौकार, २ षटकार, तिलक वर्मा ५०- ६२ चेंडू, १ चौकार, ३ षटकार, रिषभ धवन ३४, शार्दुल ठाकूर ५१ -३३ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, जेकब डफी १०-१-४५-२, मॅथ्यू फिशर ८-०-६१-२, मिशेल रिप्पोन ७.३-०-४३-२) वि. वि. न्यूझीलंड अ ः ३८.३ षटकांत सर्वबाद १७८ (डेन क्लेवर ८३ -८९ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, राहुल चहर ७-०-३९-२, राज बावा ५.३-०-११-४, कुलदीप यादव ६-०-२९-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT