India Tour of NewZealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतील सर्व सामने अॅमेझॉन प्राइम वर प्रसारित केले जाणार आहेत. आतापर्यंत भारतीय संघाचे बहुतेक सामने Sony Liv किंवा Hotstar वर लाइव्ह स्ट्रीम केले जात होते, परंतु यावेळी क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा आनंद घेण्यासाठी अॅमेझॉन प्राइम डाउनलोड करावे लागेल. भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यादरम्यान तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळवले जातील. (IND vs NZ LIVE Streaming Amazon Prime Video signs advertisers for 1st time India Tour of NewZealand cricket news )
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याशिवाय चाहत्यांना अॅमेझॉन प्राइमवर इतर अनेक व्हिडिओही पाहायला मिळतील. अॅमेझॉन प्राइम देखील एक नवीन मिनी-सिरीज लाँच करत आहे, जी न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील प्रतिस्पर्धी दर्शवेल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज कुलदीप सेन हा संघातील नवा चेहरा असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी कुलदीपचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी 20 आंतरराष्ट्रीय संघ
शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, उमरन, उमरन, मलिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.