New Zealand T20 Squad For India Tour  
क्रीडा

IND vs NZ: T20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर… धाकड खेळाडू बाहेर

या मालिकेतही पुन्हा एकदा नवा कर्णधार...

Kiran Mahanavar

India VS New Zealand T20 Series: टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे, या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळल्या जाणार आहे. न्यूझीलंडने या दौऱ्यासाठी आधीच एकदिवसीय संघ जाहीर केला असून आता टी-20 संघाचीही घोषणा केली आहे. या मालिकेतही पुन्हा एकदा नवा कर्णधार दिसणार आहे.

न्यूझीलंडने टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंड संघाची कमान केन विल्यमसनच्या हाती राहणार नाही. या मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी मिचेल सँटनरला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 27 जानेवारीपासून दोन्ही संघांमधील टी-20 मालिका सुरू होणार आहे.

केन विल्यमसनशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीही भारत दौऱ्यावर येणार नाही. या दोन्ही खेळाडूंना वनडे आणि टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. टीम साऊदीला नुकतेच न्यूझीलंड कसोटी संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंवरील वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. टॉम लॅथमला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे.

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा T20 संघ

मिचेल सँटनर, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT