क्रीडा

IND vs NZ Playing 11: शमी-सूर्याला संधी मिळणार की शार्दुल खेळणार? टीम इंडियासमोर आज न्यूझीलंड, कोण बनणार नंबर 1?

सुनंदन लेले

India Vs New Zealand Playing 11 : इतर सर्व संघांसमोर छाती पुढे काढून सर्वोत्तम खेळ करणारा भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धांत न्यूझीलंडसमोर का आणि कसा मागे पडतो, या प्रश्‍नाचे उत्तर देत पराभवाचे दुष्टचक्र संपवण्याची वेळ आली आहे. निसर्गसुंदर धरमशालाचे मैदान हे त्यासाठी योग्य ठिकाण आहे. याच मैदानावर आज (ता. २२) फॉर्मात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये सामना होत आहे. चोहोबाजूंनी वेढलेल्या पर्वतरांगांना साक्षी ठेवून दोन्ही देशांतील क्रिकेटपटू अटीतटीची लढत देतील, अशी आशा क्रिकेटप्रेमी करीत आहेत.

२००३ मधील विश्वकरंडक स्पर्धेत सामन्यात मिळवलेल्या विजयाचा अपवाद वगळता न्यूझीलंड संघाने कसेही करून भारतीय संघाला पराभूत करायचा मार्ग आयसीसी स्पर्धांमध्ये शोधला आहे. कधी २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी नागपूरला भारतीय फलंदाजांना चकवले; तर कधी २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या प्रमुख फलंदाजांना बाद केले. याचा अर्थ स्पष्ट आहे, न्यूझीलंड संघाची गोलंदाजी विविधतेने नटलेली आहे. महत्त्वाची बाब अशी, की त्यांचे गोलंदाज धावा रोखायला नव्हे, तर फलंदाजांना बाद करायची हिंमत ठेवतात. आता भारतीय फलंदाजांना त्याचेच सडेतोड उत्तर द्यायचे आहे.

केन विल्यम्सन आणि टीम साऊदी खेळत नसूनही न्यूझीलंड कमजोर वाटत नाही, इतके गुणवान खेळाडू त्यांच्या संघात आहेत. सलामीला येणारा डेव्हॉन कॉनवे, मधल्या फळीतला डेरील मिचेल आणि टॉम लॅथम फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्‍री या वेगवान त्रिकुटासोबत मिचेल सँटनर योग्य जबाबदारी पार पाडत आहे. भारतीय संघाला रविवारी याच परिपूर्ण संघाला पराभूत करायचे असल्यास लक्षपूर्वक दमदार खेळ करावा लागेल.

अर्थातच सध्याच्या घडीला भारतीय संघही जबरदस्त लयीत खेळतोय. रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुल सातत्याने चांगली फलंदाजी करत आहेत. बुमराने समोर आलेल्या सर्व फलंदाजांना अचूक मारा करून जखडून ठेवले आहे. फिरकीची जोडी रवींद्र जडेजा-कुलदीप यादव मधल्या षटकात फलंदाजांना बाद करून सामन्याचा कल भारतीय संघाकडे झुकवत आहेत.

खेळपट्टी फलंदाजीस पोषक

धरमशाला मैदानाची खेळपट्टी भरपूर रोलिंग करून फलंदाजीला पोषक बनवली जात आहे. तसेच न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळू नये म्हणून गवताचे प्रमाण अत्यल्प ठेवले जाणार आहे.

हार्दिकऐवजी कोण?

हार्दिक पंड्याची जागा कोण घेणार याची उत्सुकता आहे. कप्तान हार्दिकच्या बदल्यात पूर्ण फलंदाज संघात घेतो की रवी अश्विनचे अष्टपैलू रूप पसंत करतो हे बघायचे आहे. मोहम्मद शमीलाही कधी संधी दिली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

हार्दिक पंड्याची जागा कोण घेणार याची उत्सुकता आहे. कप्तान हार्दिकच्या बदल्यात पूर्ण फलंदाज संघात घेतो की रवी अश्विनचे अष्टपैलू रूप पसंत करतो हे बघायचे आहे. मोहम्मद शमीलाही कधी संधी दिली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT