IND Vs NZ Semi Final World Cup 2023  
क्रीडा

IND Vs NZ Semi Final : भारत-न्यूझीलंड सामन्यात पाऊस नाही तर... मैदानातील दव मोठी समस्या

Kiran Mahanavar

IND Vs NZ Semi Final World Cup 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मधील पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला होता. मात्र, या वर्ल्ड कपमध्ये भारताने दोन्ही संघांमधील सामन्यात चार गडी राखून विजय मिळवला.

उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे दुपारी 2:00 वाजता सुरू होईल. याच मैदानावर भारताने या स्पर्धेत श्रीलंकेवर 302 धावांनी शानदार विजय नोंदवला होता.

कशी असेल खेळपट्टी?

मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे मोठ्या स्कोअरिंग सामन्यांसाठी ओळखले जाते. खेळपट्टी लहान सीमारेषेसह फलंदाजीसाठी योग्य आहे, ज्यामुळे चौकार आणि षटकार सहज मारता येतात. तर गोलंदाजीच्या दृष्टीकोनातून खेळपट्टी फिरकीपटूंना फारशी मदत देत नाही.

मात्र, दुसऱ्या डावात नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना खूप मदत करतो. याच कारणामुळे भारताने श्रीलंकेला 55 धावांवर बाद केले होते.

या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी 261 धावांची आहे. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करून एकूण 14 सामने जिंकले असून 13 सामने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहेत. वानखेडे स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्या 438/4 आहे, दक्षिण आफ्रिकेने 2015 मध्ये यजमान भारताविरुद्ध केली होती.

कसे असेल हवामान ?

हवामान संकेतस्थळ Accuweather नुसार, मुंबईत सूर्यप्रकाश असेल आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील. ताशी 14 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि 44 टक्के आर्द्रता असल्याने पावसाचा धोका नाही. मात्र, रात्री दव पडण्याची खात्री आहे. अशा परिस्थितीत, नंतरच्या 10-15 षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT