India vs New Zealand, 1st ODI Shubman Gill 
क्रीडा

Shubman Gill: 9 षटकार 19 चौकार! फक्त 28 चेंडू अन् 130 धावा; गिलने मोडले अनेक विश्वविक्रम

Kiran Mahanavar

India vs New Zealand, 1st ODI Shubman Gill : शुभमन गिलने रेकॉर्ड ब्रेक खेळीत टीम इंडियाला धावांचा डोंगर उभारून दिला आहे. हैदराबादमध्ये त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्‍या या धाकड सलामीवीरांना न्यूझीलंडविरुद्ध शानदार द्विशतक ठोकले.

शुभमन गिलने अवघ्या 145 चेंडूत हा पराक्रम केला. या 23 वर्षीय खेळाडूने 9 षटकार, 19 चौकारांच्या जोरावर ही खास कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. भारतासाठी रोहित शर्माने तीन द्विशतके झळकावली आहेत. हा पराक्रम सर्वप्रथम सचिन तेंडुलकरने केला होता. यानंतर सेहवाग आणि इशान किशन यांनीही द्विशतके झळकावली आहेत.

दुहेरी शतक झळकावणारा शुभमन गिल हा सर्वात तरुण

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा शुभमन गिल हा सर्वात तरुण खेळाडू आहे. या खेळाडूने वयाच्या 23 वर्षे 132 दिवसांत ही कामगिरी केली. इशान किशनने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते. त्यावेळी किशनचे वय 24 वर्षे 145 दिवस होते. रोहित शर्माने वयाच्या 26 वर्षे 186 दिवसांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावले.

शुभमन गिलने द्विशतक कसे केले?

शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. आपल्या स्फोटक खेळीत गिलने 19 चौकार आणि 9 षटकार मारले आणि त्याचा स्ट्राइक रेट 140 च्या आसपास होता. गिलच्या द्विशतकाचा पॅटर्न जबरदस्त होता. शुभमन गिलने पहिल्या पन्नास धावांसाठी 52 चेंडू खेळले. यानंतर 87 चेंडूत शतक पूर्ण केले. गिलने 122 चेंडूत 150 धावा केल्या आणि नंतर सलग तीन षटकार मारत 145 चेंडूत द्विशतक पूर्ण केले.

शुभमन गिल हा न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1999 साली 186 धावांची इनिंग खेळली होती आणि आता गिल त्याच्या पुढे गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT