रविचंद्रन अश्विनने एजाज पटेल 
क्रीडा

ind vs nz test : सही रे! अश्विनकडून एजाज पटेलला खास गिफ्ट

Kiran Mahanavar

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताय संघाने पाहुण्या संघावर 372 धावांनी मोठा विजय मिळवला आसला पण तरीही हा सामना मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलच्या शानदार गोलंदाजीसाठी ओळखला जाईल. पटेलने पहिल्या डावात भारताच्या सर्व 10 विकेट घेतल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. मालिकावीर ठरलेल्या रविचंद्रन अश्विनने सामन्यानंतर एजाज पटेल यांची भेट घेतली आणि त्यांना टीम इंडियाची जर्सी दिली. विशेष म्हणजे या जर्सीवर भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूंची स्वाक्षरी आहे.

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी एजाज पटेल आपल्या कुटुंबासह मुंबईहून न्यूझीलंडला गेले. तिथेच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि करिअर म्हणून क्रिकेटची निवड केली. भारताविरुद्ध मुंबईत खेळण्याची संधी मिळाली तेव्हा या सामन्यात तो अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करेल, असे त्याला कधीच वाटले नव्हते. पहिल्या डावात 10 विकेट्स घेतल्याशिवाय दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याने एकूण 14 विकेट घेतल्या. भारतीय संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. याआधी भारतीय संघ कानपूर कसोटी अवघ्या एका विकेटने गमावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT