Rishabh Pant sakal
क्रीडा

Rishabh Pant : न्यूझीलंडच्या 'फ्लॉप शो' दरम्यान ऋषभ पंत गंभीर जखमी? ड्रेसिंग रूममध्ये...

सोशल मीडियावर सध्या ड्रेसिंग रूममध्ये एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे

Kiran Mahanavar

Rishabh Pant IND vs NZ 3rd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ धावांसाठी धडपडताना दिसत आहे. दरम्यान ऋषभ पंत चिंतेत आणखी भर पडली आहे. सोशल मीडियावर सध्या ड्रेसिंग रूममध्ये एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये ऋषभ पंत वैद्यकीय मदत घेताना दिसत आहे. मात्र, याबाबत संघ किंवा खेळाडूकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

ऋषभ पंत ड्रेसिंग रूममध्ये झोपला असून वैद्यकीय पथकातील एक सदस्य खांद्याची तपासणी करत असल्याचे त्या फोटोत दिसत आहे. सध्या परिस्थिती स्पष्ट नाही. न्यूझीलंडविरुद्ध पंतची फ्लॉप कामगिरी कायम राहिली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही स्फोटक फलंदाजाची बॅट चमत्कार करू शकली नाही. 16 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने तो 10 धावाच करू शकला.

ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळल्या गेलेल्या 50 षटकांच्या पहिल्या सामन्यातही पंत फ्लॉप राहिला, त्याने 65 च्या स्ट्राइक-रेडने 15 धावा काढून बाद झाला. दोन्ही संघांमधील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. याआधी टी-20 मालिकेदरम्यानही पंतला दुसऱ्या सामन्यात 6 धावा करता आल्या होत्या. त्यादरम्यान पहिला सामनाही पाऊस आला होता आणि तिसऱ्या सामन्याचा निर्णय डीएलएसद्वारे झाला.

ऑक्टोबरमध्येही टी-20 विश्वचषकादरम्यान पंतचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर त्याच्या दुखापतीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तो गुडघ्यावर बँडेज बांधलेला दिसत होता. मात्र, विश्वचषकात संघाने ठळकपणे दिनेश कार्तिकला मैदानात उतरवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT