Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy
Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy sakal
क्रीडा

IND vs NZ: 'न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापेक्षा रोहित अन् विराटने रणजी क्रिकेट खेळावी...'

सकाळ ऑनलाईन टीम

India vs New Zealand ODI : न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकलेली आहे, त्यामुळे तिसऱ्या सामन्याला महत्त्व नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी सराव करण्याकरिता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुढच्या आठवड्यातील रणजी सामन्यात खेळावे, असे मत माजी कसोटीपटू वासिम जाफरने व्यक्त केले आहे. (Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy)

भारत-न्यूझीलंड मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी होत आहे आणि रणजी स्पर्धेतील अखेरचे साखळी सामनेही मंगळवारी सुरू होत आहेत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे.

विराट कोहली आणि केएल राहुल अखेरचा कसोटी सामना डिसेंबर २०२२ मध्ये खेळले आहेत, तर रोहित शर्मा त्याचा अखेरचा कसोटी सामना मार्च २०२२ मध्ये खेळलेला आहे. चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनाडकट हे कसोटी खेळाडू सौराष्ट्रकडून अगोदरच रणजी सामन्यात खेळत आहेत; तर तंदुरुस्ती सिद्ध edकरण्यासाठी रवींद्र जडेजाही सौराष्ट्र संघातून खेळणार आहे.

कसोटी सामन्यापूर्वी रणजी सामन्यात खेळणे फार महत्त्वाचे आहे. कदाचित एक किंवा दोन डाव तुम्हाला खेळायला मिळतील, पण त्याचा फायदा निश्चितच होईल. तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा; परंतु कसोटी सामन्यासाठी रेड बॉलवरील सराव महत्त्वाचा असतोच, असे जाफर म्हणतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका भारतासाठी सर्वार्थाने महत्त्वाची आहे. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्यासाठी ही मालिका जिंकणे किंवा बरोबरीत सोडवणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्व खेळाडूंचा कसोटीसाठीचा सराव महत्त्वाचा आहे.

भरतलाही रणजी खेळू द्या

यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत एकदिवसीय संघात आहे, पण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खेळायची संधी मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्यालाही आंध्रकडून रणजी खेळण्यासाठी मुक्त करावे, असे जाफरने सुचवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी रिषभ पंत संघात नसल्यामुळे ईशान किशन आणि केएस भरत यांची निवड करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT