क्रीडा

पुजाराचं नेमकं काय चुकलं? वाचा डेल स्टेन काय म्हणतो...

विराज भागवत

दुसऱ्या डावात भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद झाला

लंडन: न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाने भारताला (Team India) पराभूत करून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे (WTC Finals) पहिलेवहिले विजेतेपद (Champions) पटकावले. सामन्यात सातत्याने आलेल्या पावसाच्या (Rain Hit Test Match) अडचणींमुळे खेळ सहाव्या दिवसापर्यंत रंगला. कसोटी सामन्याच्या या राखीव दिवशी भारताचा संघ १७० धावांत बाद झाला आणि न्यूझीलंडला विजयासाठी केवळ १३८ धावांची आवश्यकता होती. २ गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी सामना जिंकला आणि करंडकावर (Trophy) नाव कोरलं. भारतीय संघाची फलंदाजी अत्यंत बेजबाबदार (Irresponsible Batting) आणि खराब झाली. भरवशाचा समजला जाणार चेतेश्वर पुजारादेखील (Cheteshwar Pujara) संघाला पराभव टाळू शकला नाही. पुजाराचं नेमकं काय चुकलं? याचं उत्तर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने दिलं. (IND vs NZ WTC Finals Where Cheteshwar Pujara mistaken Dale Steyn Explains the Reason)

"पुजारा दुसऱ्या डावात खेळत असताना त्याने चूक केली. जर दोन वर्षांपूर्वीचा पुजारा खेळत असता, तर त्याने बॅकफूटवर जाऊन कव्हर्सच्या दिशेने चेंडू नक्कीच टोलवला असता. काल मात्र शॉट खेळताना तो द्विधा मनस्थितीत फ्रंटफूटवर आला. त्यामुळेच त्याला चेंडू नीट खेळता आला नाही आणि तो अतिशय सोप्या पद्धतीने बाद झाला. इतक्या चांगल्या खेळाडूने पहिल्या स्लीपमध्ये झेलबाद होणे हे खूपच चुकीचे आहे", अशा शब्दात डेल स्टेनने पुजाराची चूक अधोरेखित केली.

"मला पुजाराची फलंदाजी कायम लक्षात राहते. पुजारा आपल्या फूटवर्कच्या बाबतीत खूपच चांगला खेळायचा हे मी पाहिलंय. पायावर आलेल्या चेंडूंना हळूवार दिशा देणं आणि चेंडू जमिनीलगत मारणं यातच पुजाराचा हात कोणीच धरू शकणार नाही. त्याने मारलेले कट शॉट आणि बॅकफूट ड्राइव्ह्ससुद्धा माझ्या लक्षात आहेत. वेगवान खेळपट्ट्यांवर तो तसेच फटके खेळतो. पण भारतातील खेळपट्ट्या संथ असतात त्यामुळे तो जमिनीवर फटकेबाजी करतो. अशाप्रकारे विविध खेळपट्ट्यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपला खेळ बदलणे हा खरा खेळ असतो. तोच खेळ खेळण्यात पुजारा काहीसा मागे पडताना दिसला", असंही डेल स्टेन म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT