ind vs pak asia cup 2022 arshdeep singh drop catch sakal
क्रीडा

Video : कुणीही 'त्याला' बोलायचं नाही, विराटनं घेतली अर्शदीपची बाजू...

टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने सोपा झेल सोडला, त्यानंतर त्याच्यावर टीका झाली. मात्र विराट कोहली...

Kiran Mahanavar

Arshdeep Singh Catch Ind Vs Pak : आशिया चषक-2022 मध्ये रविवारी टीम इंडियाचा पाकिस्तानने पाच विकेट्सनी पराभव केला. पुन्हा एकदा प्रेक्षकांना येथे एक रोमांचक सामना पाहायला मिळाला, शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात टीम इंडियाकडून शेवटी एक चूक झाली. आसिफ अलीने युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडून झेल सोडला होता, त्यानंतर त्याच्यावर बरीच टीका केल्या जात आहे.

हा झेल सोडल्यानंतर आसिफ अलीनेही चौकार आणि षटकार मारला, शेवटी भारताने हा सामना गमावला आणि चाहत्यांनी ड्रॉप कॅच हा पराभवाचे कारण सांगितले. अर्शदीप सिंगने नंतर एक ओव्हर टाकून सामना वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला पण अर्शदीपवर टीका झाली तेव्हा संघातील अनेक ज्येष्ठ आणि माजी खेळाडूंनी त्याचा बचाव केला.

सामन्यानंतर विराट कोहलीने अर्शदीपची बाजू घेतली, ज्याने 18 व्या षटकात पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीचा झेल सोडला. तो पत्रकार परिषदेत म्हणाला, दबावाखाली चुका होतात. हा मोठा सामना होता आणि परिस्थिती कठीण होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलो तेव्हा शाहिद आफ्रिदीच्या चेंडूवर मी खराब शॉट खेळलो आणि आऊट झालो. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत मी गच्चीकडे बघत राहिलो आणि मला झोप येत नव्हती. अशा परिस्थितीत सर्व सीनियर खेळाडू ज्युनियर खेळाडूंना पाठीशी घालतात, प्रत्येकजण आपल्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो, हा खेळाचा भाग आहे. विराट कोहलीशिवाय माजी क्रिकेटर इरफान पठाणने हरभजन सिंगनेही अर्शदीपच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.

आशिया चषक-2022 च्या सुपर-4 सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून 5 विकेटने पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 181 धावा केल्या. माजी कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आणि त्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या. पण पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले आणि अखेरच्या षटकात भारताचा पाच विकेट्स राखून पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT