virat kohli rohit sharma kl rahul sakal
क्रीडा

Ind Vs Pak Asia Cup 2022: टीम इंडियाची 'त्रिमूर्ती' पाकिस्तानविरुद्ध पुन्हा अपयशी

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी

Kiran Mahanavar

Ind vs Pak Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी ठरली. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहली या त्रिमूर्तीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तिघेही 53 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकातही असेच काही घडले होते. यावेळेसही विराट कोहली तिघांमध्ये सर्वाधिक धावा केल्या.

अशिया कप च्या पहिल्या सामन्यात चाहत्यांच्या अपेक्षा संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून होत्या, त्यापैकी पहिली निराशा उपकर्णधार केएल राहुलने केली. भारताच्या डावातील दुसऱ्या चेंडूवर केएल राहुल बाद झाला. युवा नसीम शाहने केएल राहुलला क्लीन बोल्ड केले, तो गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार रोहित शर्माने 18 चेंडूत केवळ 12 धावा करू शकला. रोहित शर्माने त्याच्या डावात षटकार मारला असेल, तो पूर्णपणे संघर्ष करताना दिसला.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यात पुनरागमन करत होता, सर्वांच्या नजर त्याच्याकडे लागल्या होती. दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला जीवदान मिळाले, त्यानंतर तो रंगात परतताना दिसला. आधी षटकार मारला आणि नंतर काही चौकार मारले. मात्र पुन्हा एकदा त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करता आले नाही. विराट कोहलीने 34 चेंडूत 35 धावा करून झेलबाद झाला.

भारतासमोर पाकिस्तानने 148 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या होत्या. त्याच्याकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. अखेरीस शाहनवाज दहानीने सहा चेंडूत 16 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT