Ind vs Pak Asia Cup 2023  
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup 2023 : आशिया कप फायनलमध्ये पुन्हा रंगणार भारत अन् पाकिस्तान थरार, जाणून घ्या समीकरण

Kiran Mahanavar

India Vs Pakistan Asia Cup 2023 Final Scenario : आशिया कप 2023 मधील सुपर-4 चा थरार आता रंगात आला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले. गटातील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. पण सुपर-4 मध्ये दुसऱ्यांदा सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

एकदिवसीय किक्रेटच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यामुळे सुपर-4 च्या गुणतालिकेत जबरदस्त चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पण यासोबतच चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना आता या आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामनाही पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये हा सामना होऊ शकतो. हा विजेतेपदाचा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाईल.

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाला सुपर-4 फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. या फेरीतील संघाचा दुसरा सामना आज (१२ सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. यानंतर तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध (15 सप्टेंबर) होईल. तर पाकिस्तानचा सुपर-4 मधील शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे.

भारत आणि पाकिस्तानचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे समीकरण

- भारतीय संघाने पुढील सामन्यात श्रीलंकेला हरवले तर अंतिम फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. यानंतर टीम इंडियाला बांगलादेशसोबतही सामना खेळावा लागणार आहे, जो पुन्हा औपचारिक राहील.

- पाकिस्तानचा शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. बाबर आझमच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत भारताशी सामना होईल.

- पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसाने वाहून गेला तर दोन्ही संघांचे 3-3 गुण असतील. त्यानंतर नेट रन रेट दिसेल. त्या स्थितीत श्रीलंका पात्र ठरेल कारण त्याचा नेट रन रेट अधिक चांगला आहे.

- पुढच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला हरवले तर टीम इंडियाला बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत पोहोचण्याची पूर्ण आशा असेल. पण अंतिम फेरीसाठी पाकिस्तानला त्यांच्या पुढच्या सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT