Ind vs Pak Reserve Day Rules  
क्रीडा

Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान सामना पूर्ण झाला नाही, तर काय असतील 'रिझर्व्ह डे'चे नियम?

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Ind vs Pak Reserve Day Rules : आशिया कप 2023 च्या सुपर 4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना कोलंबो येथे खेळल्या गेला . या सामन्यात पाऊस पुन्हा एकदा खलनायक ठरला.

यापूर्वी याच स्पर्धेतील गट सामन्यात पावसामुळे खेळ खराब झाला होता. हे पाहता आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता सामना रिझर्व्ह डेला गेला आहे. रिझर्व्ह डेला सामना गेल्याने याचे काय नियम असतील हे जाणून घेऊ.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम खेळण्याचे निमंत्रण दिले. कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी 100 चेंडूत 121 धावांची भागीदारी केली. आता केएल राहुल आणि विराट कोहली क्रिजवर खेळत आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा भारतीय डावात केवळ 24.1 षटके झाली होती. यावेळी भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 147 धावा होती.

'रिझर्व्ह-डे'चे काय आहेत नियम?

1- सर्व प्रथम, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आज सर्व प्रयत्न करूनही सामना सामन्याच्या वेळीत पूर्ण होऊ शकला नाही तरच सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. सामन्याच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत निकाल जाहीर होण्याचा प्रयत्न अंपायर करतील. मात्र त्यानंतरही सामना न झाल्यास तो राखीव दिवशी घेण्यात येईल.

2- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामन्याच्या दिवशी सामना थांबवल्या जाणाऱ्या ठिकाणाहून राखीव दिवशी सामना सुरू होईल.

3- पहिल्या दिवशी षटके कमी करून सामना राखीव दिवसात गेला, तर राखीव दिवशीही तेवढीच षटके होतील. जर आज इथून पुढे एकही षटकांचा सामना झाला नाहीत, तर उद्या इथून पुन्हा सामना सुरू होईल आणि तो पूर्ण 50 षटकांचा असेल.

4- राखीव दिवशीही सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही तर तो रद्द केला जाईल आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT