Shubman Gill World Cup 2023 Esakal
क्रीडा

Shubman Gill Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यात शुभमन गिल खेळणार? संघातील खेळाडूंच्या आधीच पोहचला अहमदाबादला

Kiran Mahanavar

Shubman Gill World Cup 2023 :

चेन्नईत ऑस्ट्रेलियाला आणि दिल्लीत अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया अहमदाबादला गेली आहे. भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपचा तिसरा सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या शानदार सामन्यापूर्वी शुभमन गिलचे एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय संघातील खेळाडूंच्या आधीच अहमदाबादला पोहोचला आहे.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल वर्ल्डकप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला नाही. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी त्याला डेंग्यू झाला होता. भारताने पहिला सामना चेन्नईत खेळला होता, जिथे गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी तो टीम इंडियासोबत दिल्लीलाही गेला नव्हता. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शुभमन गिल अहमदाबादला पोहोचले आहेत. मात्र शुभमन खेळणार की नाही यावर सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, शुभमन बुधवारी रात्री चेन्नईहून अहमदाबादला पोहोचला, तर टीम इंडियाचे इतर खेळाडू आज येथे पोहोचतील. चांगली बातमी म्हणजे गिल बरा दिसत आहे, जर गिल तंदुरुस्त असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. शुभमन गिलने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

अशा परिस्थितीत त्याची प्रकृती ही टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. त्याने या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये 72.35 च्या सरासरीने आणि 105.03 च्या स्ट्राइक रेटने 1,230 धावा केल्या आहेत.

2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. त्याने हा सामना 6 विकेटने जिंकला. यानंतर टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यातही भारतीय संघाने एकतर्फी 8 गडी राखून विजय मिळवला. आता त्याच्यासमोर पाकिस्तान संघ आहे, जो आपले दोन्ही सामने जिंकून या स्पर्धेत उतरतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT