Ind vs Pak Watch Virat Kohli Incredible Innings sakal
क्रीडा

Virat Kohli : पाकिस्तानच्या तोंडचा घास हिसकावला अशी विराटची अविश्वसनीय खेळी, पहा एका क्लिकवर

विराटची संपूर्ण पर्यावरण पूरक फटाकेबाजी

Kiran Mahanavar

Ind vs Pak Watch Virat Kohli Incredible Innings : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रविवारी विराट कोहलीने मेलबर्नमध्ये ऐतिहासिक खेळी खेळली. एक अशी खेळी जी पुढील अनेक वर्षे भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहील. कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 154.72 होता. टी-20 वर्ल्ड कपने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने कोहलीच्या इनिंग दाखवले आहेत.

टीम इंडियाला कोहलीने आपल्या फलंदाजीने असा विजय मिळवून दिला की सर्वजण आनंदोत्सव साजरा करू लागले. मेलबर्नमध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली. भारतात लोक रस्त्यावर नाचू लागले. अगदी शांत खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेला टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडही पूर्ण उत्साहात दिसले. कोहलीच्या खेळीची जादू अशी होती की महान फलंदाज सुनील गावसकर स्टेडियममध्ये नाचू लागले.

कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याच्या शानदार गोलंदाजीमुळे टीम इंडियाने पाकिस्तानला 159 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात भारताने 20 षटकांत 6 बाद 160 धावा करून सामना जिंकला. कोहलीशिवाय हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. अश्विनने कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय धावा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT