South Africa vs India 1st ODI Team India Playing 11  
क्रीडा

Sa vs Ind ODI : ऋतुराज पहिल्या वनडेतून बाहेर, 3 खेळाडू करणार पदार्पण; हे आहे भारताची प्लेइंग-11?

Kiran Mahanavar

South Africa vs India 1st ODI Team India Playing 11 : 2023 वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर टीम इंडिया आजपासून वनडे क्रिकेटला सुरूवात करणार आहे. वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ प्रथमच वनडे खेळताना दिसणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना जोहान्सबर्ग येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होणार आहे. जाणून घ्या पहिल्या वनडेत टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड पहिला वनडे खेळणार नाही. गायकवाडला ताप आहे आणि त्यामुळे पहिल्या वनडेत तो टीम इंडियाचा भाग नसल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. अशा स्थितीत गायकवाडच्या जागी रजत पाटीदार डावाची सुरुवात करू शकतो.

पहिल्या वनडेत तीन खेळाडू पदार्पण करणार?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये तीन भारतीय खेळाडू पदार्पण करू शकतात. यामध्ये स्टार फिनिशर रिंकू सिंग आणि सलामीवीर साई सुदर्शन आणि रजत पाटीदार यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू पहिल्या वनडेत पदार्पण करू शकतात.

पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार केएल राहुलने स्पष्ट केले आहे की, तो विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. संजू सॅमसन मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसणार असल्याचे संकेतही त्याने दिले. अशा स्थितीत राहुल चौथ्या क्रमांकावर आणि सॅमसन पाचव्या क्रमांकावर खेळणार आहेत.

साई सुदर्शन आणि रजत पाटीदार पहिल्या वनडेत डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. यानंतर संजू सॅमसन आणि रिंकू सिंग.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या रूपात दोन फिरकी गोलंदाज असतील. मुकेश कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग या तीन वेगवान गोलंदाज प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील.

पहिल्या वनडेत भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : साई सुदर्शन, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT