Team India
Team India esakal
क्रीडा

IND vs SA : कटकचा इतिहास काय सांगतो?

धनश्री ओतारी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (India vs South Africa 2nd T20) क्रिकेट टीम दुसऱ्या टी-20 मॅचसाठी दिल्लीहून कटकला पोहोचल्या आहेत. गुरूवारी झालेल्या पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 विकेट राखून रोमांचक विजय मिळवला. मात्र, कटकच्या बाराबती स्टेडियमचं रेकॉर्ड भारताच्या बाजूने नाही. टीम इंडियाचा इतिहास फार चांगला नाही.

भारताने या मैदानात एकूण 2 टी-20 मॅच खेळल्या आहेत. यातल्या एका सामन्यात त्यांचा विजय झाला तर एकदा त्यांना पराभव पत्करावा लागला. 2015 साली दक्षिण आफ्रिकेनेच या मैदानावर भारताचा पराभव केला होता, त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकन टीम त्याच विश्वासाने मैदानात उतरेल.

त्या सामन्यात भारतीय टीमला पहिले बॅटिंग करत फक्त 92 रन करता आल्या होत्या, 7 खेळाडूंना तर दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी 22-22 रन केले होते. फास्ट बॉलर एल्बी मॉर्कलने 3 तर क्रिस मॉरिस आणि इम्रान ताहीर यांना 2-2 विकेट मिळाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 17.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. जेपी ड्युमिनीने नाबाद 30 रन केले होते.

त्यामुळे भारताला या मैदानात यापूर्वीच पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात उतरताना मोठ्या तयारीने उतराव लागेल.

प्रेक्षकांनी तिसऱ्यांदा फेकाली बॉटल

दोन षटकांनंतर प्रेक्षकांनी पुन्हा रिकाम्या पाण्याच्या बाटल्या मैदानात फेकण्यास सुरुवात केली. यावेळी पंचांनी अर्धा तास खेळ थांबवला. पोलिसांनी बाटल्या फेकणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढले आणि उर्वरित सामना खेळवण्यात आला.

या सामन्यानंतर भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कबूल केले की या सामन्यात आपल्या संघाने चांगली कामगिरी केली नाही. यासोबतच तो प्रेक्षकांबद्दल म्हणाला होता की कदाचित त्यांना बाटल्या फेकण्यात जास्त मजा येत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT