Mohammed Siraj South Africa vs India 2nd Test Marathi News 
क्रीडा

Sa VS Ind : मियाँ का मॅजिक! सिराजसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या; 55 धावांवर खेळ खल्लास

Mohammed Siraj News |

Kiran Mahanavar

Mohammed Siraj South Africa vs India 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, जो मोहम्मद सिराजने चुकीचा ठरवला.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खळबळ उडवून दिली. त्याने यजमान संघाच्या फलंदाजांना सावरण्याची एकही संधी दिली नाही. यामुळे बुधवारी पहिल्याच सत्रात संपूर्ण संघ 23.2 षटकात अवघ्या 55 धावांत ऑलआऊट झाला. यासह भारताने केपटाऊनमध्ये प्रथमच कसोटी सामना जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर बरोबरीच्या इराद्याने आलेल्या टीम इंडियाने आश्चर्यकारक कामगिरी केली. सेंच्युरियन कसोटीत ज्या गोलंदाजीमुळे भारताचा पराभव झाला. त्याच गोलंदाजीने येथे कहर केला. या उजव्या हाताच्या गोलंदाजाने आपल्या स्विंग आणि बाऊन्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 9 षटकात 15 धावांत 6 विकेट घेतल्या. सिराजशिवाय बुमराह आणि मुकेश कुमारने 2-2 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अवस्था इतकी बिकट होती की, त्यांचे फक्त 2 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यष्टिरक्षक काइल वीरेनने सर्वाधिक 15 धावांची खेळी खेळली. बेडिंगहॅमने 12 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय मार्कराम 2, एल्गर 4, जॉर्जी 2, स्टम्स 2 धावा करून बाद झाले. यान्सनला खाते उघडता आले नाही. महाराजांनी 3 रबाडाने 5 तर बर्गरने 4 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT