Virat Kohli Dance Viral Video

 

Esakal

क्रीडा

IND vs SA: शतक झळकावल्यावर विराट कोहलीचा मैदानावर नागीण डान्स, Video होतोय तुफान व्हायरल

Virat Kohli Dance Viral Video: रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचा नागीण डान्स तुफान व्हायरल झाला आहे. त्याच्या फॅन्सनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

Puja Bonkile

viral video: बुधवारी भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत 4 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण तरी बुधवारी रायपूरचे मैदान भारतासाठी विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या दोन फलंदाजांनी शतके करत गाजवले. विराटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. या मॅच दरम्यान विराट कोहलीचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विराट दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमासमोर पहिले पंजाबी स्टाइल भांगडा आणि नंतर नागीण डान्स करतांना दिसला आहे.

व्हायरल व्हिडिओ

व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टावर meme.thekaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की विराट कोहली पंजाबी स्टाइलमध्ये भांगडा करत आहे नंतर त्याचा नागीण डान्स पाहायला मिळत आहे. विराटचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच विराटचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते देखील आनंदी झाले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की," हे देवा या व्यक्तीला नेहमी आनंदी ठेव, बाकी सर्व ठीक आहे"

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका यूजने लिहिले की 'चिकू', तर दुसऱ्याने कमेंट केली की 'अब क्या करेंगा' तर अनेक नेटकऱ्यांनी हार्ट शेप आणि स्मायली इमोजी दिले आहेत.

विराट कोहलीचे हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सातवे वनडे शतक ठरले असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धही सर्वाधिक वनडे शतके करणारा खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT