yuzvendra chahal and umpire fun moment sakal
क्रीडा

VIDEO : पुन्हा चहलचा मैदानात आगाऊपणा, अंपायरला गेला मारायला अन्...

युझवेंद्र चहलने अंपायरच्या 'त्या' जागेवर मारली बुक्की - व्हिडिओ

Kiran Mahanavar

Ind vs Sa Match Yuzvendra Chahal : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात युझवेंद्र चहलला पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागले. मात्र, असे असूनही तो अनेकदा चर्चेत असतो. सामन्यादरम्यान त्याने मैदानावर असे काही केले, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चहल अंपायरसोबत मस्ती करताना दिसत आहे.

भारताचा डाव सुरू होता आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज वेन पारनेल गोलंदाजी करत होता. पारनेलच्या पाचव्या चेंडूवर केएल राहुल काहीशा अडचणीत दिसला, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. यादरम्यान ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल यांनीही मैदानात पाणी आणि टॉवेल आणले. एकीकडे ऋषभ पंत सहकारी खेळाडूंसोबत दिसला, तर दुसरीकडे युझवेंद्र चहल अंपायरसोबत मस्ती करताना दिसला. मस्ती करत असताना युजीने अंपायरला गुडघ्याने मारायला गेला. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत एका चाहत्याने लिहिले की, युजीभाईंची दुनिया वेगळी आहे. पर्थच्या अवघड खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 133 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 67 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने चार आणि वेन पारनेलने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 24 धावांत तीन विकेट गमावल्या, पण त्यानंतर एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर यांच्या अर्धशतकी भागीदारीने भारताकडून सामना हिसकावून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT