ind vs sa t20 match analysis 
क्रीडा

Team India : बुमराह भुवी नसेल तरी भारतीय गोलंदाजी एक नंबर

मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीची चिंता

Kiran Mahanavar

India vs South Africa 1st T20I Analysis : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने विजयी सुरुवात केली आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने शानदार सुरुवात केली. पहिल्या 15 चेंडूत केवळ नऊ धावांत दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. येथून सामन्यातील भारताचा विजय निश्चित झाला. मात्र यानंतर आफ्रिकन संघाने झुंज देण्याचा जोरदार प्रयत्न केला. भारताने हा सामना आठ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात अर्शदीप सिंग आणि दीपक चहर या जोडीने खूप प्रभावित केले. यानंतर लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनीही आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.

भुवनेश्वर-बुमराहशिवाय भारतीय गोलंदाजी एक नंबर

भारताचे दोन सर्वात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या सामन्यात संघात नव्हते. अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू हार्दिकला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रोहितकडे फक्त पाच गोलंदाज होते. गोलंदाजी कमकुवत दिसत होती. मात्र सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 चेंडूतच भारताची गोलंदाजी कमकुवत नसल्याचे सर्वांनाच कळले. अर्शदीप आणि दीपक चहरने 15 चेंडूत नऊ धावा देत दक्षिण आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. टी-20 विश्वचषकातही भारताला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनीही नंतरच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. अश्विनने चार षटकांत केवळ आठ धावा दिल्या.

मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीची चिंता

मधल्या षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेचे पाच फलंदाज नऊ धावांवर बाद केल्यानंतर शेपटीच्या फलंदाजांना 97 धावा केल्या. भारताला यावर काम करावे लागणार आहे. खेळपट्टी पाहता भारतीय गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेला सहज बाद करता आले असते, पण तसे झाले नाही. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी 19 व्या षटकात धावा लुटल्या. यावेळी अर्शदीपने 19व्या षटकात 17 धावा दिल्या. आतापर्यंत भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे 19 वे षटक करताना महागडे ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: ‘एमपीएससी’ भरतीला अचानक स्थगिती; सरकारी अभियोक्ता पदांवर वकिलांचा संताप, राजकीय हस्तक्षेपाचा आरोप..

Latest Marathi News Live Update : काळाराम मंदिरात आज 'धर्मध्वज' सोहळा; माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

Mumbai vs Lucknow Match Betting : मुंबई विरूद्ध लखनौ सामन्यावर बेटिंग, कोल्हापुरात नगरसेविकेच्या मुलासह चौघांना अटक; पोलिसांची लॉजवर धाड

Tamil Nadu Politics: तामिळनाडूत नवा राजकीय अध्याय, विजय यांचा सत्तेवर दावा, बहुमतासाठी दोन आठवड्यांची शक्यता!

West Bengal Violence: निकालानंतर कोलकात्यात थरार! टीएमसी कार्यालयावर बुलडोझर, रस्त्यांवर भीषण गोंधळ; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT